• icon Jaysingpur College Campus, Jaysingpur
  • iconaemsjcj@gmail.com

Opening Hours : Monday to Saturay - 9 Am to 4 Pm

Call us: (02322) 225180, +91-8275450655,

+91-9763514907

  • icon

Anekant Education Society’s

Anekant English Medium School, Jaysingpur

Facilities

थोडा वेळ आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी........


पालकांनो,
थोडा वेळ आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी........ ज्या महाराष्ट्रात केवळ SSC चे 48000 च्या जवळपास 90 पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर CBSE आणि ICSE ची घातली की हा आकडा 60000 च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये 200 पैकी 190 च्या वर गुण घेणारे केवळ 10 विद्यार्थी आणि 75 टक्के म्हणजे 150 गुण घेणारे केवळ 2889 म्हणजे 60000 पैकी केवळ 5 % विद्यार्थी. काय करायचं या दहावीच्या गुणवत्तेचं. MHTCET हे हाल तर JEE तर विचारायलाच नको.

95 % जे या प्रक्रियेत मागे पडले त्यांच्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी पण मेडिकल आणि IIT ची स्वप्न पाहिली होती. 3 ते 6 लाखपर्यंत फी देऊन विद्यार्थ्यांनी 11 वी साठी प्रवेश घेतला होता. 11 वी व 12 वी चे शिक्षक पण चांगले होते, विद्यार्थी पण हुशार होते मग विद्यार्थी मागे का पडले?

10 वी व 11 वी च्या अभ्यासक्रमात खूप फरक असतो. 10 वी पर्यंत विद्यार्थी फक्त पाठांतर करून परीक्षा देत असतात, पण 12 वी नंतरच्या प्रवेश परिक्षेत (JEE, NEET, CET, NDA, CLAT) पाठांतरचा उपयोग होत नाही. तिथे गरज असते ती कन्सेप्ट clear असण्याची ते ही 5 वी पासूनचे. जर विद्यार्थ्यांना IIT, AIIMS, NDA व इतर चांगल्या इंजिनिअरिंग , मेडिकल कॉलेजला प्रवेश हवा असेल तर त्याची तयारी 5 वी पासूनच करावी लागेल. यासाठी आम्ही जयसिंगपूर येथे Olympiad स्कूल सुरू केले आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटी ही 65 वर्षांपूर्वी स्थापन केलेली संस्था आहे.

Olympiad school म्हणजे काय?

Olympiad स्कूल मध्ये आम्ही नियमीत अभ्यास क्रमाबरोबर 1 ली पासून Olympiad परीक्षेची ( इंग्लिश , सायन्स , गणित) तयारी करून घेऊन सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवतो. एका वर्गामध्ये 20 च विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकाना सर्व विद्यार्थ्यांच्या कडे लक्ष देता येते. स्कूल मध्ये सुरवातीपासूनच कन्सेप्ट क्लिअर केले जातात. विद्यार्थ्यांचे concept clear झाले असतील तरच Olympiad परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात. ऑलिम्पियाड परीक्षेत प्रत्येक वर्गासाठी जवळपास 2 लाख विद्यार्थी (32 देशातील) बसतात. 6 वी व 9 वी ला प्रतिष्ठित अशा होमी भाभा या परीक्षेची तयारी करून बसवले जाते. या परीक्षेसाठी देशभरातुन 70000 विद्यार्थी बसतात. तसेच 10 वीला NTSE या देशातील सर्वांत प्रतिष्ठित अशा परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेसाठी देशभरातुन 10 लाख विद्यार्थी बसतात व त्यातुन शिष्यवृत्ती साठी फक्त 2000 विद्यार्थी निवडले जातात. त्याचबरोबर 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा 11 वी व 12 वी चा 50 % Syllabus पूर्ण करून घेतला जातो. 5 वी पासून गणित शिकवणारे शिक्षक हे Engineer आहेत, Science शिकवणारे शिक्षक Msc B.Ed व Engineer झालेले आहेत.

या सर्व परीक्षेच्या तयारीमुळे विद्यार्थ्यांचे concept क्लिअर होतात व त्यामुळे त्यांना 11 वी व 12 वी चा अभ्यासक्रम सोपा जातो. यामुळे विद्यार्थी JEE , NEET ,NDA व इतर प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून त्यांना IIT , AIIMS , NDA व इतर चांगल्या इंजिनीअरिंग व मेडिकल कॉलेज मध्ये निश्चितच प्रवेश मिळवतील. स्कूल मधील इतर सुविधा :
1. जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. 27 एकरचा परिसर
2. स्कूल मध्ये 50 मी. लांबीचे राष्ट्रीय पातळीचे swimming पूल आहे. प्ले ग्रुप पासून सर्व विद्यार्थ्यांना पोहण्यास शिकवले जाते ( प्रत्येक वर्षी 1 महिना).
3. स्कूल मध्ये 400 मी. चे running track उपलब्ध आहे. विद्यार्थी दररोज 800 मी running करूनच वर्गात जातात त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.
4. पुढील 30 वर्षात मानवी जीवनात Artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे महत्व खूप असणार आहे. तसेच पुढील 30 वर्षात सर्वाधिक व्यवसाय संधी व नोकऱ्या Artificial intelligence क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत. रोबोटिक्स ही Artificial intelligence ची पहिली पायरी आहे. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी रोबोटिक्स चे प्रशिक्षण दिले जाते.
5. आपण जे अन्न खातो ते कुठून येते हे कळावे यासाठी जून ते डिसेंबर मध्ये विद्यार्थी स्वतः शेती करतात. यात ते मेथी, कोथिंबीर, मिरची व इतर भाजीपाला पिकवतात.
6. विद्यार्थ्यांच्या कडून प्रत्येक वर्षी छोटे छोटे science चे प्रोजेक्ट बनवून घेतले जातात. (यासाठी फारतर 30 रु खर्च येतो व यातील 90% काम हे विद्यार्थी करतात.) यामुळे विद्यार्थ्यांना science चे कन्सेप्ट नीट कळतात. यावर्षी विद्यार्थ्यांनी Mini robot, ATM Machine, Emergency torch, Automatic bridge बनवले आहे. यासाठी प्रत्येकी 35 रु खर्च आला आहे.
7. 2021पासून निवासी स्कूल सुरू होत आहे.

प्रवेश: प्ले group ते 8 वी ( स्कूल 12 वी पर्यंत असणार आहे पण 8 वी नंतर नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही.)


प्रवेशासाठी संपर्क :
Anekant Olympiad School Jaysingpur college campus जयसिंगपूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर मोबा. 9326064523

We provide

Facilities

We have a well-equipped range of facilities and resources for all students from Kindergarten to Grade 10 to help them achieve a well-rounded education in a child-friendly atmosphere. It is our vision that each student enjoys their years of education and reach to their full potential.

We provide effective school facility which is responsive to the changing programs of educational delivery and a physical environment that is comfortable, safe, secure, accessible, well illuminated, well ventilated, and aesthetically pleasing.

About

Library

The school boasts well-stocked library with an impressive index of titles, covering fiction and non-fiction, periodicals, magazines, and newspapers. Students are encouraged to make full use of these facilities in order to inculcate a love for books and the habit of reading from an early age. Internet facilities are available for research and study.

Digital classrooms

Digital classrooms are highly effective collaborative devices to facilitate classroom teaching and digital learning.

Kindergarten Activity Rooms

These well-equipped and spacious rooms provide a wide variety of resources aimed at stimulating the interest of young students during recreation as well as during specific class activities.

Sports Facilities

Indoor Games Area, outdoor Games Area, 400 Meters Race Track, Synthetic courts for Badminton, Swimming Tank etc.

Security System & CCTV

The safety and security of our students is our priority in school. In order to provide a secure environment for our students, the school has taken the initiative to install CCTV cameras around the school campus to ensure safety at all times.

Transport Facilities

We provide transport facilities as per students' requirement.

1240+

Students enrolled

2480+

Happy Parents

85+

Teachers